अमळनेर येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घेतली राज्यमंत्री बच्चू कडू यांची सांत्वन भेट

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झाले होते. या निमित्ताने अमळनेरातील प्रहार जनशक्तीचे पदाधिकाऱ्यानी संत्वनभेट भेट दिली आहे.

 

प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष तथा राज्याचे राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यानिमित्ताने अमळनेर येथील प्रहारचे कार्यकर्त्यांनी यांनी बच्चू कडू यांच्याकडे द्वार दर्शनाच्या निमित्ताने सांत्वनपर भेट दिली. यावेळी अमळनेर तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत देखील चर्चा करण्यात आली. बच्चु कडू यांना अमळनेर नगरीत येण्याचे आमंत्रणही यावेळी देण्यात आले. दरम्यान लवकरच पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ते मेळावास उपस्थित राहण्याचे ना. बच्चु कडू यांना आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष गुलाब पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, दिनेश पाटील, हिरामण पाटील, भैय्या भाऊ पाटील आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!