विधानपरिषदेच्या १० सदस्यांना निरोप ; जुलै महिन्यात संपणार कामकाजाची मुदत

भाजपचे संख्याबळ घटणार,

 मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा : विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नऊ सदस्यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात येत असून  आहे. त्यानिमित्ताने या दहा विधान परिषद सदस्यांचा निरोप समारंभ राजकीय टोले शेरेबाजीसह मिस्कील टीकाटिपण्यात रंगला.

विधानपरिषदेचे १० सदस्यांच्या कामकाजाची मुदत जुलै दरम्यात संपणार आहे. यात सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रवींद्र फाटक, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौंड, या दहा सदस्यांचा समावेश आहे. या विधान परिषद आमदारांना विधान परिषदेतर्फे निरोप देतेवेळी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी भाजप आमदार प्रसाद लाड, दरेकर यांना बोचरे चिमटे घेत सर्व सदस्यांची कामगिरी, अनुभवाबाबत विवेचन केले.

दहा जागांसाठी होणार निवडणूक
विधानपरिषदेचे दहा जागांवरील सदस्य जुलै महिन्यात सेवा निवृत्त होणार आहेत. यात सर्वात जास्त ६ सदस्य भाजपाचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदाराचा यात समावेश आहे. या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मे अखेर निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येण्याचे संकेत असले तरी सध्याच्या संख्याबळापेक्षा भाजपचे दोन आमदार कमी होण्याची दाट शक्यता आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!