अमळनेर ग्रामीण कुटा शाखेकडून अंगणवाडीस खुर्च्यांचे वाटप

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील कळमसरे येथील अंगणवाडीत अमळनेर ग्रामीण कुटा शाखेच्या वतीने बालकांना २० खुर्च्या व बसण्यासाठी सतरंज्या देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच जितेंद्र पाटील हे होते.कुटा शाखेचे मनेजर पुंडलिक बडवे त्यांचे सहकारी बबलू पिंजारी कैलास पाटील रवी खतार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलनने कार्यक्रमची सुरुवात झाली. अंगणवाडी च्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पिंजारी यांनी सूत्रसंचालन केले तर सुशीला पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बचतगट अध्यक्ष अर्चना पाटील यांचे सहकार्य लाभले.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!