डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परिसरात सदस्या डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सारा केसर मँगो बागेत तब्बल २ हजार ८०० वृक्षांचे रोपण करण्यात आले.

तसेच गेल्यावर्षी डॉ.केतकी यांच्या वाढदिवसानिमित्त कोकोनटची लागवड करण्यात आली होती. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्‍त वृक्षांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९ ऑगस्ट रोजी प्रिन्सेस किवा क्राऊन पॉईंट, प्रोफेसर सतीश सावके हिल, सारा केसर मँगो बाग आणि टी पॉईंण्टचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्थान श्रीमती गोदावरी पाटील, अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, किवा पाटील आदिंची उपस्थीती होती. 

याप्रसंगी सारा केसर मँगो बागेत २ हजार ८०० रोपांचे रोपण तसेच २०२० मध्ये केतकी कोकोनट नावाने ५४१ नारळाची झाडे लावण्यात आले होते. त्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्‍ताने वृक्षांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळी गोदावरी इंजिनियरींग महाविद्यालयात डॉ.केतकी पाटील यांच्या औक्षणांसह केक कटिंग करत वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंर गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, जळगाव येथेही डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्‍त कार्यक्रम घेण्यात आला. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व होमिओपॅथी महाविद्यालयातर्फे डॉ.केतकी पाटील हॉलमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर उत्सवमूर्ती डॉ.केतकी पाटील यांच्यासमवेत श्रीमती गोदावरी पाटील, डॉ.उल्हास पाटील, अधिष्ठात डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, किवा पाटील, संजय भिरुड, होमिओपॅथीचे प्राचार्य डी.बी.पाटील, डॉ.माया आर्विकर, आयएमआरचे संचालक डॉ.प्रशांत वारके, इंजिनिअरींग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड आदि उपस्थीत होते.

उपस्थीतांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. केक कटिंग करुन डॉ.केतकी पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयातील सर्व स्टाफने पुष्पगुच्छ देवून डॉ.केतकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालय, भुसावळ आणि सावदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ.केतकी पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

 

Protected Content