पाचोरा येथे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी स्विकारला पदभार

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांची भोर (पुणे) येथे बदली झाली असुन त्यांचे जागी शिरपुर (धुळे) येथील डॉ. विक्रम बांदल यांची उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती झाली असून त्यांनी आज (दि.९) रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. 

यावेळी तहसिलदार कैलास चावडे यांनी डॉ. विक्रम बांदल यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय तसेच महसुल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, जे काम उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी या भागात केले आहे. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला न्याय व हक्क मिळवुन देण्यार असल्याचे यावेळी डॉ. विक्रम बांदल यांनी सांगितले.

Protected Content