एरंडोल येथे डीआयजी विशेष पथकाची पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर धाड; दहा जणांना अटक

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथे नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलिसांनी पत्त्याचा जुगार अड्ड्यावर धाड टाकून दहा जणांना अटक केली तर आरोपींकडून १ लाख रुपये रोख रक्कम व १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर धाड नाशिक विभाग डीआयजी विशेष पथकातील पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास धारागीर नजीक असलेल्या हॉटेल शेर-ए-पंजाब च्या मागील बाजूस बापू चौधरी याच्या लिंबूच्या बागेत सुरू असलेल्या झना मन्ना पत्त्याचा जुगार खेळत असताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले या कार्यवाहीमुळे पत्त्याचा जुगार खेळणारे व जुगार चालक यांच्या घोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून शहरात व परिसरात पत्त्यांचे क्लब व सत्ता बॅटिंग हे अवैध धंदे छुप्या मार्गाने सुरु होते त्यामुळे डीआयजी विशेष पथकातील पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २५ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नाशिक डीआयजी विभागाच्या विशेष पोलीस पथकातर्फे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धारागीर येथे सदर धाड टाकण्यात आली व खालील आरोपींना झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना रंगे हात पकडण्यात आले यामध्ये पुढील आरोपींचा समावेश आहे.

यांना केली अटक
स्वप्नील मुरलीधर पाटील बोरगाव, मच्छिंद्र नारायण महाजन विखरण, सुनील नाना पाटील खडके, रफीक खान याकूब खान जहांगीर पुरा एरंडोल, पंढरी खुशाल पाटील खडके खुर्द, शांताराम राजाराम महाजन अमळनेर दरवाजा एरंडोल, अमित लक्ष्मण परदेशी, परदेशी गल्ली एरंडोल, गुलाब महादू पाटील खडके, सिद्धार्थ हिम्मतसिंग परदेशी परदेशी गल्ली एरंडोल, राजेश मोतीराम पाटील रोटवद ता.धरणगाव,

सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव संदीप पाटील नितीन सपकाळे विश्वेश हजारे दीपक ठाकूर उमाकांत ठाकरे सुरेश टोंगारे अमोल भामरे यांच्या पथकाने केली या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्यादी सचिन जाधव यांनी फिर्याद दिल्यावरून एरंडोल पोलीस स्टेशनलागुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विकास देशमुख, राजीव पाटील, अखिल मुजावर, संदीप सातपुते, राहुल बैसाने हे पुढील तपास करीत आहे.

Protected Content