ग्रॅव्हिटी, गणित व ओला, उबरवरून प्रियंकांनी उडविली सरकारची खिल्ली !

PRIYANKA GANDHI

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील मंदिबाबत अचाट कारणे देणार्‍या मोदी सरकारची आज काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी क्रिकेटमधील एका अफलातून कॅचच्या व्हिडीओच्या माध्यमातून जोरदार खिल्ल उडविली आहे.

देशात मंदिचे वातावरण असतांना मोदी सरकारचे मंत्री यासाठी वेगवेगळी कारणे देत आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी वाहन क्षेत्रातील मंदीसाठी ओला व उबरसारख्या सेवांना कारणीभूत ठरविल्याने सोशल मीडियात त्यांची टर उडविण्यात आली आहे. यानंतर मातब्बर मंत्री पियुष गोयल यांनी तर गुरूत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईन यांनी लावल्याचे अचाट वक्तव्य केल्याने तेदेखील मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. यासाठी त्यांनी क्रिकेट सामन्यातील एका अफलातून कॅचचा संदर्भ घेतला आहे.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात लाँग ऑफवरील एक क्षेत्ररक्षक षटकार असणार्‍या चेंडूला विलक्षण चपळाईने मैदानाच्या आत आपल्या सहकार्‍याकडे फेकून फलंदाजाला बाद करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओसोबत ”सही कैच पकड़ने के लिए अंत तक गेंद पर नजर और खेल की सच्ची भावना होनी जरुरी है। वरना आप सारा दोष ग्रॅव्हिटी, गणित, ओला-उबर और इधर-उधर की बातों पर मढ़ते रहेंगे। भारतीय अर्थव्यवस्था के लिए जनहित में जारी।” असे खोचक वक्तव्य कॅप्शन म्हणून देण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांची जोरदार खिल्ली उडविली आहे.

पहा : प्रियंका गांधी यांनी केलेले ट्विट आणि यातील व्हिडीओ.

Protected Content