थेरोळा परिसरात बिबट्याचा धुमाकुळ; एक गाय केली फस्त

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील थेरोळा परीसरात बिबट्याचा धुमाकुळ सुरु असून रात्री एक गाय फस्त केल्याचे समोर आले आहे.  या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील थेरोळा येथील शेतकरी युवराज भावळू पाटील यांच्या शेतात बांधलेली गायीला मध्यरात्री बिबट्याने फस्त केल्याचे आज सकाळी उघडकीला आले. या घटनेमुळे शेतकऱ्यांसह नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वनपाल अतुल तायडे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. हल्ला करणारा बिबट्याच असल्याचे निष्पन्न झाले. मागील एक वर्षापासुन बिबट वावर असून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.  वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Protected Content