जुने बी.जे. मार्केटमधील खतांच्या दुकानात लागलेल्या आगीत ४० ते ५० लाखांचे नुकसान; जिल्हापेठ पोलिस ठाण्यात झाली नोंद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  शहरातील जुने बी.जे. मार्केट परिसरात  श्रीराम समर्थ या खते विक्रीच्या दुकानाला लागलेल्या आगीत ४० ते ५० लाखांचे नुकसान झाल्याची नोंद बुधवार १६ मार्च रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील विनोद दत्तात्रय सोळुंके वय ३७ यांचे जुने बी. जे मार्केट येथे श्रीराम समर्थ अॅग्रो नावाने खते विक्रीचे दुकान आहे . या दुकानाला बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली.  आगीची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानातील इन्व्हर्टर, ५० किलो सेंद्रीय खत, पेस्टिसाइड  याप्रमाणे  ४० ते ५० लाख रुपयांचा माल खाक होऊन नुकसान झाल्याची खबर दुकानाचे मालक विनोद सोळुंके यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहायक फौजदार पुरुषोत्तम वागळे हे करीत आहेत.

 

Protected Content