१२ ते १४ वर्ष वयोगटासाठी लसीकरण मोहिमेची अमलबजावणी (व्हिडिओ)

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यासह राज्यात १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी बुधवार १६ मार्चपासून संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्यात लसमात्रेचा पुरवठा उशिराने झाल्यामुळे आज गुरुवारी शहरातील मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयासह सामान्य रुग्णालयात १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींना गुलाबपुष्प देत स्वागत करून लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

 

जिल्ह्यात संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम गेल्यावर्षी १६ जानेवारी २०२१ पासून टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाखाहून अधिक असून लसीकरण पात्र लोकसंख्या ३६ लाख २६ हजाराहून अधिक आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८२ टक्क्यापेक्षा जास्त तर दुसऱ्या टप्प्यात देखील बऱ्याच नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. तर १५ ते १७ वर्षवयोगटातील सव्वादोन लाख किशोरवयीनांपैकी दोन लाख १५ हजार किशोरवयीनाचे लसीकरण झाले आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून या वयोगटातील मुलामुलींसाठी कार्बोवेक्स लस मात्रेचा पूरवठा केला जात आहे. त्यासाठी नागरिक पालकांनीच पुढाकार घेऊन मुलामुलींचे संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हा स्तरावरून जनजागृतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुरुवातील लस मात्रेचा पुरवठा मर्यादित असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुकापातळीवर ग्रामीण रुग्णालय तसेच सामान्य रुग्णालयासह मनपाच्या रुग्णालयात १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी लसीकरण केले जात असल्याचे जिल्हा लसीकरण समन्वयक तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांनी म्हटले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/380928410516210

 

Protected Content