कोरपावली येथे मोबाईल युनिट व्हॅन सेवेत

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावलीजवळ असलेल्या महेलखेडी गावात जळगाव जिल्ह्यात प्रथमच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन म्हणजेच चालता फिरता दवाखाना उपलब्ध झाला असुन यास ग्रामीण नागरिकांकडुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 ग्रामीण भागात विशेषता : म्हणजे आदिवासी भागात आरोग्य सेवेसाठीतीलअसणाऱ्या अनास्ता दूर करण्यासाठी व ग्रामस्थांना आरोग्य सेवेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे  मिशन अंतर्गत फिरत्या दवाखाण्याची संकल्पना मांडण्यात आली, या कामात सरकारी हस्तक्षेप टाळण्यासाठी सामाजिक संस्थांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असुन , यात सर्वसाधारण रूग्णांसाठीची ओ पी डी, विशेषतः गरोधार महिलांसाठी आरोग्य सुविद्या, लहान मुलांना गोळ्या औषधी तसेंच रक्तगट तपासणी  ही सात प्रकारच्या पद्धतीने करण्यात येते, अशी माहिती आरोग्य कर्मचारी यांच्या कडून प्राप्त झाली आहे, फिरत्या दवाखाण्यात एक मोठी मोबाइल व्हॅन आणि एक चार चाकी वाहन व युनिटमध्ये एक महिला  वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा तज्ञ परिचारिका, दोन वाहन चालक शिपाई  असा पथक आहे, या पथकात डॉ,  कांचन बारी, निलेश सोनवणे, लैब टेकनिकल  तयराम जाधव, अरुण चौधरी, परंतु किरोन काळामुळे शासनाच्या नव्या पद्धतीच्या फिरत्या दवाखान्याला  नागरिकांच्या अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते

 

Protected Content