महावितरण कंपनीच्या बदली विषयक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीच्या बदली विषयक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्यात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी अयोध्यानगरातील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर महाराष्ट्र स्टेट ईलक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने कामगार संघटनांसोबत चर्चा करून बदली धोरण निश्चित परिपत्रक काढून अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र कंपनीने तयार केलेल्या बदली धोरण फसले आहे. गेल्या तीन वर्षापासून विविध कारणे पुढे करून इच्छुक कामगारांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त, पती-पत्नी एकत्रीकरण, सेवानिवृत्तीस काही वर्ष शिल्लक असताना हवी असलेली बदली, बदली धोरण अंतर्गत लांब ठिकाणी गेलेले कर्मचारी यानी परत मूळच्या ठिकाणी मागितलेली बदली, नवीन लागलेले कामगार घरापासून हजारो किलोमीटर दूर आहेत त्यांना आपल्या भागामध्ये हवी असलेली बदली, पदोन्नतीवर पदस्थापना देण्यापूर्वी मुख्यकार्यालय झोन, मंडळ, विभाग कार्यालय पातळीवर प्रथम विनंती बदल्या करून नंतर पदस्थापना देण्यात येत होती. परंतू कोणत्याही बंदल्यावंतर शासनाची स्थगिती नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असतांना महावितरण कंपनीतच्या मनमानी कारभार सुरू असून प्रत्येकवेळी कंपनीचे प्रशासना कामगार संघटना आणि कामगारांची दिशाभूल करत आहे. कंपनीची आर्थीक परिस्थितीच्या नावाखाली वसुली सुरू आहे. वसुली नाही केली तर खासगीकरणाचे ढोंग करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केली जात आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात राज्याभरात महावितरण बदली विषयक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरातील अयोध्यानगरातील महावितरण कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी देविदास सपकाळे, प्रकाश कोळी, विलास तायडे, जितेंद्र अस्वार, मुकेश बारी, मनोज देवराळे, दीपक मराठे, वैभव वानखेडे, किशोर जगताप, प्रभाकर महाजन, शरद बारी, सचिन फड, गिरीष बर्हाटे, मनोज जिचकार, निखिल पटले, संतोष सुर्यवंशी, चंद्रकांत कोळी, पवन पातालबन्सी, विनोद सोनवणे, किरण सपकाळे, गणेश सातपुते, अनिल धोबी, कमलाकर काकडे यांच्यासह आदी कर्मचारी, अभियंत व अधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Protected Content