यावल महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘जागतिक ओझोन दिन’ निमित्त रसायनशास्त्र विभागामार्फत ‘ओझोन क्षय, परिणाम व उपाय’ या विषयावर प्रा. नरेंद्र पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे या होत्या. कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील उपस्थित होते. प्रा.पाटील यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “ओझोनचे क्षय हे पर्यावरण प्रदूषणामुळे जास्त प्रमाणात होत असून त्याचा दुष्परिणाम मानवासह इतर सर्व सजीवांवर होत आहे, त्यासाठी आपण सर्वानी प्रदूषण टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला.

उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार (रसायनशास्त्र) यांनीही ओझोनचे दुष्परिणाम यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी समाजात जाणीव जागृती निर्माण करावी तसेच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून पर्यावरणातील प्राणवायूची पातळी वाढवून पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर‌. डी. पवार यांनी केले तर आभार डॉ. एस. पी. कापडे यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. तडवी सर, प्रा सी.टी. वसावे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content