‘चला कर्तव्य निभवू या’ हा अभिनव उपक्रम स्टेशनच्या आवारात संपन्न

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलीस स्टेशन यांचा उपक्रम ‘चला कर्तव्य निभवू या’ हा अभिनव उपक्रम स्टेशनच्या आवारात संपन्न झाला. यावेळी रावेर शहरातील डॉक्टरांना ‘जीवन रक्षक किट’चे वितरण करण्यात आले.

“जगात सर्वात जास्त रस्ते अपघाती मृत्यू भारतात होतात. त्यापैकी जळगाव जिल्हात वर्षाला चारशे ते पाचशे अपघाती मृत्यू होतात. पोलीस प्रशासनाचा ससेमिरा मागे लागू नये; म्हणून नागरिक रस्ते अपघात जखमी झालेल्यांना मदत करत नाही. परंतु मी स्वत: डॉक्टर असून जिल्ह्यात कुठेही रस्ते अपघातमध्ये जखमी झालेल्यांवर उपचार करा. आपल्या मागे कुठलाही पोलीसांचा ससेमीरा लागणार नाही.” असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी रावेर येथे केले.

यावेळी डॉ योगिता पाटील यांनी रस्ते अपघात जखमी झालेल्या रुग्णावर तात्काळ उपाचार केले. त्यांचा पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरिक्षक विशाल पाटील, सचिन नवले, मनोहर जाधव, दिपाली पाटील, डॉ एस आर पाटील, डॉ गुलाबराव पाटील, डॉ ताराचंद सावळे, डॉ प्रविण चौधरी, डॉ मिलिंद वानखेडे, डॉ भगवान कुवटे, डॉ संदीप पाटील, गोविंद महाजन आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पोलीस कर्मचारी बिजू जावरे, सोनू तडवी, पुरुषोत्तम पाटील, माधवी मोरे यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले; तर आभार प्रर्दशन डॉ मिलिंद वानखेडे यांनी मानले.

रस्त्यावर जखमी झालेल्यांना मदत करा –

“रस्त्याने प्रवास करत असतांना अपघातात जखमी झालेल्या नागरीकांना तात्काळ उपचारसाठी मदत करावी. आपण डॉक्टर असल्यास प्रवासादरम्यान त्यांच्यावर उपचार करावे. तर नागरीक असल्यास त्यांना ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहचविण्यास मदत करावी.” असे आवाहन करत आपल्या मागे कोणतेही पोलीसांचे ससेमीरा लागणार नसल्याची हमी पोलीस निरिक्षक कैलास नागरे यांनी दिली.

Protected Content