पोषक वातावरणात होळी, धुलीवंदन सन साजरी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हयात होळी, धुळवड हे सण दरवर्षी मोठया उत्सवात साजरे केले जातात. सण साजरी करतांना कायद्याचे, नियमांचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

होळी सण साजरा करत असतांना काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांना गैरवर्तन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सण साजरे करत असतांना कोणाशी गैरवर्तन होणार नाही. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही सण साजरा करत असतांना महिला, मुली, बालक यांचा अनादर होणार नाही, त्यांना चुकीच्यारीत्या स्पर्श होणार नाही. त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यावेळी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह फोटो काढण्यात येवू नये, जर चुकून असे फोटो क्लिक करण्यात आले तर ते समाज माध्यमांवर प्रसारीत न करता तात्काळ डिलीट करण्यात यावेत. सर्वानी आपल्या परिवारासोबत मित्रांसोबत हर्ष आणि उल्हासात होळी खेळतांना मुलींचा, महिलांचा, बालकांचा सन्मान ठेवावा त्यांच्याशी चुकीची वर्तनुक, आक्षेपार्ह स्पर्श होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, महिला, मुली, बालक यांना सुरक्षित वातावरणात, आनंदात सण साजरा करता यावे यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तरी सर्वांनी मिळून आपली जबाबदारी पार पाडून उत्साहात होळी साजरी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

Protected Content