सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन जळगांव जिल्हाध्यक्षपदी आकाश धनगर

जळगाव, प्रतिनिधी । सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन महाराष्ट्र राज्याची संस्थापक तुषार जाधव व प्रदेशाध्यक्ष साजिद शेख यांच्या उपस्थितीत १२ मे २०२१ रोजी झूमवर ऑनलाईन पध्दतीने झालेल्या बैठकीत सर्वानुमते जळगाव जिल्हाध्यक्षपदी आकाश धनगर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली आहे.  

 

आकाश धनगर यांनी आजपर्यंत समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठीचे कार्य पाहता त्यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशनच्या वाढीकरिता जोमाने कार्य करेल. तसेच आपण अंगीकारलेल्या समाजसेवेचे व्रत यापुढेही वटवृक्षाप्रमाणे फैलावत नेऊन समाजास त्याचा छायेखाली घेईल असे आकाश धनगर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले. आपल्या हातून देशसेवा, समाजसेवा, घडून समाजातील दुर्बल-दुर्लक्षित घटकांचे आयुष्य उज्वल करावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे अध्यक्ष साजिद शेख म्हणाले.

 

आकाश धनगर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार जाधव यांनी आकाश धनगर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष साजिद शेख, नाशिक जिल्हाध्यक्ष शिवम जाधव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रा. रामचंद्र परदेशी, वर्धा जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण, ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष खरात व जळगाव जिह्यातील समाजकार्य कर्त्यांनी आकाश धनगर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.