दोन गटात तुफान राडा; लोखंडी रॉडसह फायटरने मारहाण

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील धानवड गावातील बसस्थानकाजवळ जुन्या वादातून दोन गटात लोखंडी फायटर आणि लोखंडी रॉडचा वापर करत तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवार ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता सुमारास घडले होते. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात ८ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील धानवड येथे बुधवार ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील बसस्थानकाजवळ जुन्या वाद उरकून काढत दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एकमेकांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड, लोखंडी फायटरने हाणामारी झाली. यात गणेश भरत पाटील (वय-२०) हा तरुण जखमी झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवार ७ सप्टेंबर रोजी पहिल्या गटातील गणेश भरत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार विलास पाटील, गोपाल संजय गोराडे, जितेंद्र संजय गोराडे, विलास संतोष पाटील सर्व रा. धानवड ता. जिल्हा जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसऱ्या गटातील तुषार विलास पाटील (वय-१९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ललित भरत पाटील, गणेश भरत पाटील, भरत देविदास पाटील आणि उज्वला भरत पाटील सर्व रा.धानोरा ता. जिल्हा जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Protected Content