सुरेश अडकमोल यांचे वृद्धपकाळाने निधन

जळगाव, प्रतिनिधी | येथील आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते सुरेश अडकमोल यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. ते रेशन दुकानदार संघटनेचे व आरपीआय अध्यक्ष अनिल अडकमोल यांचे वडील होत.

 

सुरेश अडकमोल यांनी भारतीय दलित पॅंथरचे १९७३ साली पहिले शहर अध्यक्षपद भूषविले होते. ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व  राज्यमंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. आंबेडकरी चळवळीत त्यांनी नामदेव ढसाळ, राजा ढाले, शांताबाई दाणी, भाई संगारे, रा. सु. गवई, अरुण कांबळे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, चंद्रकांत हंडोरे, प्रीतमकुमार शेगावकर, गंगाधर गाडे आदी दिग्गजांन सोबत काम केले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस होते. ते राज्य परिवहन महामंडळ सदस्य होते.  तसेच शासकीय पुरवठा दक्षता समितीचे सदस्य होते. औरंगाबाद विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांनी सक्रीय सहभाग घेत नाशिक, औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, जळगाव येथे तुरुंगवास भोगला. ते रेशन दुकानदार संघटना व  आरपीआय अध्यक्ष अनिल अडकमोल यांचे वडील होत. तसेच आरपीआयचे जिल्हा सचिव भरत मोरे यांचे सासरे होत.

 

Protected Content