जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या आता झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तिघ्रे आणि खिर्डी गावात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे शनिवार १० एप्रिल रोजी सकाळी गावात जावून कोरोना प्रतिबंधक उपायासाठी जनजागृती उपक्रम राबवून ग्रामस्थांनी तपासणी करण्यात आली.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या कर्मचारी यांनी तिघ्रे आणि खिर्डी या दोन्ही गावात प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी जावून घरातील प्रत्येक सदस्यांनी ऑक्सीमीटर आणि थर्मल मीटरच्या माध्यमातून तपासणी केली. दोन्ही गावात तपासणी उपक्रमाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी तिघे व खिर्डी येथील ग्रामपंचायत परिसरात उपसरपंच दिनेश पाटील, सदस्य दिपक पाटील, सदस्य नारसिंग वसावे, सदस्य संजना गोपवाड, सदस्य शांती पावरा यांच्यासह गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या चतुर्थ वर्ष आणि जीएनएमच्या तृतीय वर्षातील इंटरशिपच्या विद्यार्थ्यांसमवेत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग डिपार्टमेंटचे प्रा. रेबिका लोंढे, प्रा. निर्भय मोहोड, प्रा. प्रिया जाधव, जीवन चौधरी प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे आदिंची उपस्थीती होती.
https://www.facebook.com/508992935887325/videos/272654854412190