Home Cities जळगाव जळगाव विभागात विभाग नियंत्रक जगनोर यांनी सांभाळला कार्यभार

जळगाव विभागात विभाग नियंत्रक जगनोर यांनी सांभाळला कार्यभार

0
102

 

 

जळगांव :  प्रतिनिधी। एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाच्या विभाग नियंत्रकपदी बीड येथून बदली होऊन आलेले भगवान जगनोर यांनी कार्यभार सांभाळला.

 

28 फेब्रुवारी रोजी राजेंद्र देवरे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे जळगाव विभाग नियंत्रकपदी नेमके कोण येते याबाबत उत्सुकता होती.

 

भगवान जगनोर यांनी यापूर्वी बीड विभागात उत्पन्नवाढीचे नवनवीन प्रयोग करून नावलौकिक कमविला आहे. त्यापूर्वी ते धुळे आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

 

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्य प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील, विभागीय खजिनदार अजमल चव्हाण, आगार सचिव निंबा महाजन, आगार अध्यक्ष गणेश पाटील, कार्याध्यक्ष बाप्पू हटकर यांनी विभाग नियंत्रक जगनोर यांचे फुल गुच्छ देऊन स्वागत केले.

 

याप्रसंगी गोपाळ पाटील यांनी उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाच्या सर्व सकारात्मक योजनांना सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.  विभाग नियंत्रक जगनोर यांनीदेखील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले.


Protected Content

Play sound