मुंबई प्रतिनिधी । बीएचआर सहकारी पतसंस्था प्रकरणातील प्रमुख संशयित सुनील झंवर याला आज मुंबई उच्च न्यायालयाने फटकारत जामीनासाठी खालील कोर्टात जाण्याचे निर्देश दिले.
बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवर याने आपल्यावरील गुन्हा दाखल करावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हा झंवरला दोन आठवड्यांसाठी संरक्षण मिळाले होते. यानंतर झंवर याने उच्च न्यायालयात जामीन मिळावा म्हणून धाव घेतली होती. यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
या सुनावणीत सुनील झंवरने पुन्हा एकदा हायकोर्टात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज ठेवल्याने त्यांना फटकारले. तुम्हाला १५ दिवस अटकेपासून संरक्षण दिल्यानंतरही तुम्ही सेशन कोर्टात का गेले नाही?, असे विचारात कोर्टाने नाराजी व्यक्त केली. तसेच पुन्हा एकदा अंतरिम संरक्षण देण्यापासून नकार दिला. यामुळे झंवर याने मुंबई हायकोर्टातील अटकपूर्व जामीनचा अर्ज अखेर मागे घेतला असून आता तो पुणे सत्र न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.