महापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्ण, लसीकरणाची माहिती

 

जळगाव, प्रतिनिधी  शहर मनपाच्या मावळत्या महापौर सौ. भारती सोनवणे यांनी शेवटच्या दिवशी देखील मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती घेतली. तसेच मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद देखील साधला. 

 

महापौर पदाचा शेवटचा दिवस असला तरीही महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आपले कर्तव्य बजावण्यात कोणतीही कसूर केली नाही. जळगाव शहराच्या विद्यमान महापौर सौ.भारती सोनवणे यांचा कार्यकाळ दि.१८ मार्च रोजी संपणार आहे. गेल्या वर्षभर कोरोना काळात दिवसरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या महापौर सौ.भारती सोनवणे या शेवटच्या दिवशी देखील जनसेवा करण्यात व्यस्त होत्या. जळगाव मनपात महापौर पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर सौ.भारती सोनवणे यांनी छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती घेतली. जेष्ठ नागरिक आणि पहिल्या फळीतील नागरिकांशी चर्चा करून त्यांनी तब्येतीची विचारपूस केली.

 

कोविड सेंटरला केली पाहणी

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नेहमीप्रमाणे दुपारी कोविड सेंटरला भेट देत रुग्णांशी संवाद साधला. कोविड सेंटरमधील सोयसुविधांची माहिती घेतली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

 

Protected Content