आशादीप वसतीगृह प्रकरणी विरोधकांनी माफी मागावी-खडसे

जळगाव प्रतिनिधी । आशादीप वसतीगृह प्रकरणी जे घडलेच नाही ते झाल्याचा आव आणत विरोधी पक्षाने जळगावची बदनामी केली आहे. यामुळे या प्रकरणी विरोधी पक्षाने जळगावकरांसह राज्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

जळगाव येतील आशदीप वसतीगृहात कथीतरीत्या गैरप्रकार झाल्याचे प्रकरण गाजत आहे. यात विरोधी पक्षांनी विधीमंडळ अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली. यात चक्क राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली. प्रत्यक्ष चौकशी मात्र असला कोणताही प्रकार घडलाच नसल्याचे दिसून आले. या पार्श्‍वभूमिवर, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी टिव्ही नाईन या वृत्त वाहिनीशी बोलतांना विरोधी पक्षावर सडकून टीका केली.

खडसे म्हणाले की, आशादीप प्रकरणी जे झालेच नाही त्याबद्दल विधानसभेत गोंधळ घालण्यात आला. यामुळे जळगावची खूप बदनामी झाली. जबाबदार विरोधी पक्षाने याबाबत खरी माहिती घेऊन वक्तव्य करणे अपेक्षित असतांना खोट्या माहितीच्या आधारे थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली. मात्र हे प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याचे समोर आल्याने विरोधी पक्षाचा दावा देखील उघडा पडला आहे.

आम्ही देखील यापूर्वी अशा स्वरूपाचे आरोप केले तेव्हा पुरावे दिले होते. यातून संबंधीतांना शिक्षा देखील झाली होती. मात्र विरोधी पक्षाने सर्व संकेत गुंडाळून ठेवत सरकारवर आरोप केले. यामुळे आता विरोधी पक्षाने जळगावकरांसह राज्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी केली. आहे. या माध्यमातून खडसे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख न करता त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडल्याचे दिसून येत आहे.

Protected Content