वैश्विक शांततेची प्रार्थना करत मुस्लीम बांधवानी अदा केली ईदची नमाज

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ईद-उलअझा अर्थातच बकरी ईद निमित्त मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्ट तर्फे अजिंठा चौक येथील इदगाह मैदानावर ईदच्या नमाजचे आयोजन करण्यात आले होते.

मौलाना उस्मान कासमी यांनी दुआ ( प्रार्थना)करताना अल्लाहाकडे साकडे घातले की, या अल्लाह मानव जातीवर तू कृपा कर ,पावसामुळे होणारी जीवित हानीला वाचव, पाऊस मानव जातीच्या हितासाठी आवश्यकतेनुसार दे, संपूर्ण समाजातिल गैरसमज दूर करून एकमेकांबद्दल आदर भावना निर्माण कर, मानवाला मानव सारखी वागणुकीचा उपदेश दे व संपूर्ण जगात सुख शांती नांदू दे अशी दुवा (प्रार्थना) केली असता त्यांच्या प्रत्येक शब्दावर उपस्थित हजारो लोकांनी आमीन म्हणून दुआ कबूल हो असे अनुमोदन दिले

मुफ्ती सलीक सलमान यांचे आवाहन
बकरी ईद – कुर्बानी – नमाज याबाबत मुफ्ती सलीक सलमान यांनी अत्यंत प्रखळपणे धार्मिक ग्रंथावरून आपले मत प्रदर्शित केले व लोकांना आवाहन केले की, कुर्बानी करा व प्रत्येक ईदची नमाज ईदगाहाच्या मैदानावरच अदा करा. यासाठी त्यांनी अंतिम प्रेषितांचे जीवन चरित्र सादर केले.

ट्रस्ट तर्फे फारुख शेख यांचे आवाहन
दुआ झाल्यावर ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना आवाहन केले की, प्रत्येक समाज बांधवाने कुर्बानी द्यावी. परंतु, त्यामुळे इतर धर्मियांची अथवा इतर बांधवांची धार्मिक भावना दुखावता कामा नये. तसेच स्वच्छता ठेवावी जर आपण याचे पालन केले तर खऱ्या अर्थाने हीच खरी कुर्बानी ठरेल. म्हणून आपण कोणाच्याही बाबत पूर्वग्रह दूषित भावनेने वागू नये. शेवटी त्यांनी ईद व आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

ईदगाह मैदानावर यांची होती उपस्थिती
ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारुक शेख, खजिनदार अशपाक बागवान, सहसचिव अनिस शहा व मुकीम शेख, संचालक ताहेर शेख, शरीफ पिंजारी, रेहान शेख, मुस्ताक बादलीवाला, रईस पटेल, तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव एजाज मलिक, काँग्रेसचे प्रदेश युवा सचिव बाबा देशमुख व काँग्रेसचे जिल्हा सचिव जमील शेख, एम. आय. एम.चे प्रादेशिक सहसचिव रयान जागीरदार, बहिणाबाई विद्यापीठाचे डॉ. गयासोद्दीन, ममता हॉस्पिटलचे डॉ. शाहिद खान व डॉक्टर माजिद खान, एडवोकेट आमिर शेख, इंजिनीयर जाहीद शेख, बॉम्बे हार्डवेअर चे हुसेन बाई मेमन, अक्सा मेडिकलचे रफिक पिंजारी, सालार नगर मशिदीचे मौलाना जुबेर विश्वस्त अफसर शेख व अफजल जनाब, पिंजारी बिरादरीचे रोशन पिंजारी, सिकलगर बिरादरीचे अजिज खान, मनियार बिरादरीचे तय्यब शेख , सलीम शेख, अश्फाक शेख, खान बिरादरीचे अताऊल्ला खान, ईदगाह चे माजी सचिव अमीन बादलीवाला यांच्यासह सुमारे चार ते पाच हजार लोकाची उपस्थिती होती.

 

Protected Content