फार्मसी कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून या चुकीच्या निर्णयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हातात मेणबत्ती व तोंडावर पट्टी बांधून सोशल मीडियावर राज्यभरातील विद्यार्थी सोमवार १३ जुलै रोजी फार्मसी कृती समितीतर्फे निषेध व्यक्त करतील असे प्रसिद्धिपत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

फार्मसी कृती समितीच्या प्रसिद्धिपत्रानुसार, राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत असं जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे यामुळेच सर्व विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये भीतीचे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. केंद्र सरकारने जरी परीक्षेसाठी परवानगी दिली असती तरी महाराष्ट्र राज्य सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करा या मागणीवर ठाम आहे. आज महाराष्ट्र मध्ये २११९८७ इतकी कोरोणा रुग्णांची संख्या आहे. अशा परिस्थितीत खरंच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे शक्य आहे का? हा विचार केंद्र सरकारने करायला हवा. एकीकडे लोक एकत्र यायला नको म्हणून लॉकडाउन वाढवायचा आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या जिवाला आणि पोचवायची यात कसला आलं शहाणपण हे देखील केंद्र सरकारने स्पष्ट करायला हवं. या निर्णयाविरोधात १३ जुलै रोजी फार्मसी कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा फार्मसी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष आकाश हिवराळे, उपाध्यक्ष प्रसाद मदने यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागासाठी खान्देश अध्यक्ष ललित पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष केतन देवरे, जळगाव तालुका अध्यक्ष पंकज महादेव वानखडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content