कला व मानव्यविद्या प्रशाळेचे नवनियुक्त संचालक डॉ.राम भावसार यांचा सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला व मानव्यविद्या प्रशाळेच्या संचालकपदी प्रा.डॉ.राम भावसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने  माध्यमशास्त्र प्रशाळा आणि कला व मानव्यविद्या प्रशाळा यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी व्यासपीठावर कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.राम भावसार, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर, संगीत विभागाच्या प्रा.अलका चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.डॉ.भावसार यांनी विद्यापीठाच्या आणि कला व मानव्यविद्या प्रशाळेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेवून काम करण्याची ग्वाही दिली. माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर, प्रा.अलका चव्हाण, डॉ.सुभान जाधव, डॉ.वीणा महाजन यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे यांनी केले. आभार डॉ.तुषार रायसिंग, यांनी मानले. यावेळी डॉ.अनिल तौर, डॉ.प्रा.तेजस मराठे, प्रा.प्रिया महाले, प्रकाश सपकाळे, पंकज शिंपी, प्रल्हाद लोहार, सिध्दार्थ बत्तीसे, कुंदन ठाकरे, मंगेश बाविसाणे आदी उपस्थित होते.

Protected Content