प्रा. शशिकांत पाटील यांचा बेस्ट पेपर अवॉर्डने सन्मान

 

अमळनेर प्रतिनिधी | आंध्रप्रदेशातील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित आयसीएसीईटी २०२१ तथा आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत मुडी प्र. डांगरी ता. अमळनेर येथील रहिवाशी तसेच कोकणातील खालापूर येथील विश्वनिकेतन व्यवस्थापन, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख प्रा. शशिकांत पाटील यांच्या संशोधन पेपरला बेस्ट पेपर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित संशोधन परिषदेत देश विदेशातील अभियंते , तंत्रज्ञ , शास्त्रज्ञ ,संशोधक, प्राध्यापक व संशोधन अभ्यासक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

तसेच अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञानावर संशोधन पेपर सादरीकरण तसेच प्रगत अभ्यासक्रमावर आधारीत संशोधन कार्यशाळा व व्याख्यानं आयोजित करण्यात आली. सुमारे ३०० संशोधन पेपर सादर करण्यात आले व हजारो संशोधकांनी ऑनलाईन सादरीकरण व सहभाग नोंदविला. प्रा शशिकांत पाटील यांनी ०३ संशोधन पेपर सादर केले व त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच न्यूरल नेटवर्कच्या साहाय्याने बिटकॉइनची किंमतची अंदाज ठरविण्यासंबंधित संशोधन लेखास संशोधन समीक्षक व तज्ज्ञ परीक्षकांनी प्रशंसनीय समीक्षेसह सर्वोत्कृष्ट पेपरची शिफारस करण्यात आली व समारोप समारंभात घोषणा करून सन्मानित करण्यात आले त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातील मान्यवरांकडून स्वागत व प्रशंसा करण्यात येत आहे. प्रा शशिकांत पाटील यांनी आतापर्यंत सुमारे ७५ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील संशोधन परिषद तसेच नियतकायकालिकातुन प्रसिद्ध केले असून ते विविध संशोधन समितींवर कार्यरत आहेत. प्रा. शशिकांत पाटील हे अमळनेर येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक एस बी पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव असून अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार व दैनिक दिव्यमराठीचे तालुका प्रतिनिंधी चंद्रकांत पाटील यांचे लहान बंधू आहेत.

Protected Content