‘ओमायक्रॉन’ विषाणूमुळे महाराष्ट्राच्या चिंतेत पडली भर

मुंबई वृत्तसंस्था | कर्नाटकनंतर आता गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटची इंट्री झालेली आहे. कर्नाटक आणि गुजरात हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असल्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे.

आधी कर्नाटक आणि आता गुजरातमध्ये जामनगर येथे ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला असल्याची माहिती माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने दिली आहे. झिम्बाब्वे या देशातून भारतात परत आलेल्या 72 वर्षीच्या वृद्धाला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे.

देशात ओमायक्रॉनचे आता एकून तीन रुग्ण झाले आहेत. कर्नाटक आणि गुजरात या शेजारील राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे.

Protected Content