सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मल्हारगड पूजन (व्हिडिओ)

चाळीसगाव जीवन चव्हाण । सह्याद्री प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दसरा सणाच्या निमित्ताने मल्हारगडाला भेट दिली असून यावेळी गड पूजन आणि भंडारा उधळून सण साजरा करण्यात आला.

सह्याद्री प्रतिष्ठान हे गेल्या सहा वर्षांपासून मल्हारगडावर सलग दसरा सण उत्साहात साजरा करीत आहेत. गडाची माहिती लोकांपर्यंत जावी व किल्ल्यावर दुर्गप्रेमींनी भेट देता यावी, या दृष्टिकोनातून सह्याद्री प्रतिष्ठानने हे कार्य सुरू ठेवले आहे. यामाध्यमातून सदर मल्हारगड हे आता संबंध राज्याला परिचित झाले आहे. दरम्यान दसरा निमित्ताने शुक्रवार रोजी सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी सहकुटुंब व परिवार एका छताखाली जमून गडावर ध्वजारोहण करून गड पूजन केले. तसेच खंडोबा देवाची तळी भरून भंडारा उधळीत मल्हारगड दसरा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वबळाच्या तालावर गोंधळ करून गीतांचा गजर करीत पारंपारिक पद्धतीने हा महोत्सव यावर्षी साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारिक कलाकारांनी मनसोक्त आनंद घेतला.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/568834901047786

Protected Content