‘सिमी’ ही बेकायदेशीर संघटना ; त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  केंद्र शासनाने त्यांच्या अधिसूचना क्रमांक S.O. ३५४ (E) २९ जानेवारी २०२४ अन्वये बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ कायद्याच्या कलम ३ च्या उप-कलम (१) द्वारे स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) ला ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित केले आहे. तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ कायद्याच्या कलम कलम ४२ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना केंद्र सरकारने अधिसूचना क्रमांक S.O. ४७५(E) दि. ५ फेब्रुवारी, २०२४ अन्वये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन देखील या कायद्याच्या कलम ७ आणि कलम ८ अंतर्गत केंद्र सरकारद्वारे वापरता येणारे अधिकार वापरतील असे निर्देश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या उपरोक्त पत्रातील सूचनांच्या अनुषंगाने कायद्याच्या तरतूदीनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने करण्यात यावी तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याबाबत तसेच या बंदीबाबत स्थानिक पातळीवर योग्य ती प्रसिद्धी देण्याबाबतही कळविल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content