Home Cities जळगाव ओरिऑन स्टेट बोर्ड शाळेत शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रम

ओरिऑन स्टेट बोर्ड शाळेत शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रम

0
40


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | के. सी. ई. सोसायटी संचलित ओरिऑन इंग्लिश मिडीयम स्कूलचा शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात नर्सरी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या शारीरिक प्रशिक्षण सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाने झाली व सांगता बक्षिस वितरणाने करण्यात आली.सदर कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, सचिव अॅड. एस. एस. फालक, प्रशासकिय अधिकारी शशिकांत वडोदकर, श्रीकृष्ण बेलोरकर तसेच संस्थेच्या सर्व शाखांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. शाळेचे प्राचार्य डॉ. ब्रूस हेंडरसन यांनी सर्व मान्यवरांचे व पालकांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार जी. बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले.


Protected Content

Play sound