के‌सीई महाविद्यालयात “इन्होवेशन ऍन्ड पेटंट” या विषयावर प्रध्यापकांसाठी चर्चासत्र

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | के‌सीई सोसायटीचे इन्स्टिट्युट ऑफ़ मॅनेजमेंट ऍन्ड रिसर्च येथे “इन्होवेशन ऍन्ड पेटंट” या विषयावर प्रध्यापकांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

युनाइटेड स्टेट्स ऑफ़ अमेरिका येथिल फ़िडरल इन्व्हेस्ट्मेंटचे व्हाइस प्रेसिडेंट चेतन महाजन हे या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन हजर होते. यावेळी के‌सीई सोसायटीचे शैक्षणिक संचालक योगेश खडके उपस्थित होते. प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी आपल्या महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक स‌ंशोधन करीत असुन त्यांचे संशोधन पेटंटेबल कसे होईल याविषयी प्रामुख्याने मार्गदर्शन करावे असे प्रमुख वक्त्यांना सांगितले.

“इन्होवेशन ऍन्ड पेटंट”, या विषयावर प्रमुख वक्ते चेतन महाजन अतिशय सहज सोप्या भाषेत प्राध्यापकांशी हितगुज साधले. त्यांचे त्या संदर्भातील असलेले शंकांचे निरसन करुन कोणते विषय पेटंट स्वरुपात तयार होऊ शकतात आणि पेटंन्ट सार्वजनिक डोनेम प्रसिद्ध करताना त्याचे लेखन कसे करावे. त्यासाठी पुर्व तयारी कशी करावी, हे त्यांनी वेगवेगळे उदाहरणे देउन समजावुन सांगितले.

आपाल्या देशातील पेटंट संदर्भातील कायदे अतिशय क्लिष्ट आहेत. यु.एस.ए. मध्ये एखादे पेटंट मिळणे त्यामानाने सोपे आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच पेटंट विषयीची आपल्या येथे जागृकता अतिशय नाही . आपले संशोधन कोणी चोरी करेल या भीतीमुळे अनेक संशोधन पब्लिक डोमेन मध्ये आणले जात नाही. जर तुमचे संशोधन हे एखादा नविन बिझिनेस उभा करण्यास सक्षम असेल तर त्याला पेटंट किंवा तत्सम इन्टेलेक्च्युअल प्रॉपर्टि राइट म्हणुन तुमच्या नावाने सुरक्षित केले पाहिजे, नाहीतर कोणीही तेच संशोधन तुमच्या कडुन घेउन त्यात थोडे बदल करुन स्वतःच बिझिनेस करु शकेल आणि तुमची इन्टेलेक्च्युअल प्रॉपर्टि राइट तुम्हाला वापरता येणार नाही. आय.एम.आर.आणि केसीई इंजिनिअरिंगचे एकुण पन्नास प्राध्यापकांनी त्यांची उपस्थिती नोंदवली. इन्स्टिट्युट ईन्होवेशन कौन्सिल आणि इन्स्टिट्युटचे आय.क्यु. ए. सी. विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्राध्यापकांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले.

 

Protected Content