राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती पुरस्कार डॉ. गजानन जाधव यांना जाहीर

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल, न्यूट्रीफील प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून साल २०१५ पासून व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, वेदनामुक्ती, रोग मुक्ती, शिशुरक्षा हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती पुरस्कार २०२३ डॉ. गजानन देवचंद जाधव तळेगाव ता.जामनेर जि.जळगाव (खान्देश) ह.मु.वाघोली पुणे यांना जाहीर करण्यात आला आहे.

डॉ.गजानन जाधव हे आयुर्वेदीक पध्दतीने २००० पासुन व्यसन मुक्त दारु सोडवा १००% व्यसन मुक्त करुन तळेगाव ता.जामनेर येथे कार्यरत होते. असून समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल न्यूट्रीफील प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या संस्थान तर्फे २०२२ पासुन वाघोली पुणे येथे मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी व्यसन मुक्त,मधुमेहमुक्त करुन मदत करण्याचे काम केले जाते. केंद्रधारक पैकी ज्या केंद्रधारकाचे काम उत्कृष्ट आहे अशा केंद्रधारकांनच्या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन उचित सन्मान केला जातो. देशभरातील लाखो लोकांना प्रबोधन करून व्यसनमुक्ती मधुमेह मुक्तीसाठी प्रयत्न करून अनेक कुटुंबीयांना नवसंजीवनी देऊन समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यसनमुक्ती,मधुमेहमुक्त केंद्रधारकाचा 2023 मध्ये भव्य पुरस्कार वितरण सोहळा अनेक मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

 

Protected Content