अमळनेरात दिमाखात फडकला १०० फुटी तिरंगा !

 

अमळनेर : प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती तिरंगा चौकात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभी आज आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने १००.३ चौरस फूट  आकाराच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी  लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील,  माजी आमदार स्मिता वाघ, उपनगराध्यक्ष विनोद लंबोळे, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड  प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.

 

३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला. अनेकांनी मिळेल तेथून तसेच गच्चीवर उभे राहून राष्ट्रध्वजास मानवंदना देत, या ध्वजारोहण सोहळ्याचा आनंद घेतला. या सोहळ्याने सर्वांच्याच  डोळ्यांचे पारणे फिटले.

 

Protected Content