जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; टॉवर चौकात महाविकास आघाडीची घोषणाबाजी (व्हिडीओ) ‍(व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील टॉवर चौकात महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीने आज भारत बंदला प्रतिसाद मिळावा यासाठी आज सकाळी ११ वाजता फुले मार्केट परिसरातील दुकानदार, हॉकर्स आणि गाळेधारकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. जळगावात सकाळपासून भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी शहरातील शास्त्री टॉवर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा काँग्रेस कमिटी, शिवसेना, लोकसंघर्ष मोर्चा आणि मनियार बिरादरी संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येवून शेतकरी विधेयक कायदा रद्द होण्यासाठी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, बोहरा गल्ली, चित्रा चौक, गोलाणी मार्केट परिसरातील दुकानदारांना आज भारत बंदच्या अनुषंगाने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, शिवसेना महानगर प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, सचिन धांडे, मनियार बिरादरीचे फारूख शेख, अशोक लाडवंजारी, वाय. एस. महाजन, दिव्या भोसले, सलीम इनामदार, ममता तडवी, मुफ्ती हारून, शिवसेनेच्या मंगला बारी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीसांचा बंदोबस्त
आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय वेरूळे यांच्यासह शहर वाहतूक शाखे पोलीस अधिकारी व महिला पोलीस यांच्या उपस्थितीत टॉवर चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/775855176332709

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/4858107234259247

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/690603721659058

Protected Content