दहिगाव प्रकरण : पोलीसांची वाहने अडवून धक्काबुक्की

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव गावात दोन समुदायांमध्ये वाद होवून धार्मीक भावना दुखावल्याने दगडफेक करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था शांततेसाठी आलेल्या पोलीसांची वाहने आडवून घेराव घालत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडली आहे. याप्रकरणी विविध कलमान्वये ४० ते ५० जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन समुदायात जातीय तेढ निर्माण होवून दगडफेक करण्यात आली होती. या अनुषंगाने पोलीस पथक हे दहिगावात आल्यानंतर बसस्थानक चौकात काही महिला व पुरुषानी एकत्र येवुन पोलीस प्रशासना विरूद्ध ठीय्या मांडून घोषणाबाजी केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता फैजपुर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरीकांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान पोलीस उपअधिक्षक अन्नपुर्णा सिंह हे पुढील गुन्हा दाखल करण्याकामी दहिगाव येथुन जात असतांना त्या ठिकाणी जमलेल्या ४० ते ५o गैरकायद्याशीर जमलेल्या मंडळीने उपअधिक्षक यांच्या शासकीय गाडीला अडवुन व घेराव घालता. या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस काँस्टेबल सुशील घुगे यांना व बंदोबस्त कामी आलेल्या पोलीसांना धक्काबुक्की करीत त्या ठिकाणी जमलेल्या गैरकायद्याशीर मंडळीने शासकीय कामात अडथळा निर्माण करत पसार झाले. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुशील रामदास घुगे यांनी पोलीसात फिर्याद दिल्याने दहिगाव गावातील ४०ते ५० अज्ञात लोकांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content