भीषण अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुन्ना तेली पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकच्या धरकेत दुचाकी वरील दोन जण ठार झाल्याची घटना गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र सवजी राठोड वय-३८ रा. सुभाषवाडी ता.जळगाव आणि प्रकाश उखा तवर वय-४५ रा. डोहरी तांडा ता. जामनेर असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरात नजीकच्या मुन्ना तेली पेट्रोल पंपाजवळ दुचाकीस्वार जितेंद्र राठोड आणि प्रकाश तवर हे त्यांची दुचाकी (एमएच १९ टीएन ६०९) वरून गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळकडे येत होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक (आरजे ११ जीए ९९०३) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जितेंद्र राठोड आणि प्रकाश तवर यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेप्रकरणी रात्री ११ वाजता ट्रकवरील अज्ञात चालका विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content