डॉ. वर्षा पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना डॉ वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन जळगाव महाविद्यालायत अभिवादन देण्यात आले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलिमा वारके यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना संबोधताना त्यांनी सांगितले की सावित्रीबाई यांच्या जीवनात खूप संकटे आलीत पण त्यांना न डगमगता सर्व संकटांना निर्धाराने हरविले. स्त्रीने ठरविले तर तिच्यासाठी काहीही शक्य नाही याचे उदाहरण म्हणजे सावित्रीमाई फुले होय. सत्यशोधक समाजाचे कार्य त्यांनी आपल्या अंतापर्यंत सुरू ठेवले. सावित्रीबाईंचा त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. शिक्षणाशिवाय मनुष्याचा विकास नाही. आपले चांगले विचार ठेवा व चांगले काम करा. आपल्या कामासोबत नेहमी प्रामाणिक रहा. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे, गुरुजनांचे नेहमी ऐकले पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content