प्रा. उमाकांत पाटील यांची जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी निवड

फैजपूर ता यावल, प्रतिनिधी । येथील पत्रकार प्रा. उमाकांत पाटील यांनी पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्संबधी केलेली जनजागृती व वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्याची राज्य पातळीवर दखल घेऊन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र) या संस्थेच्या जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी निसर्ग व पर्यावरण संरक्षण प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील सरांच्या मार्गदर्शन नुसार आबासाहेब मोरे व विलासराव महाडिक यांनी जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणुन एका लेखी पत्राद्वारे प्रा. उमाकांत पाटील यांची नियुक्ती केली. यानिवडीबद्दल प्रा.पाटील यांचे प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, प. पू. श्याम चैतन्यजी महाराज, शास्त्री भक्तीकिशोरदासजी, प.पू. सुरेशशास्त्री मानेकर बाबा यांचेसह असंख्य वृक्ष व पर्यावरण प्रेमी नागरिक, पत्रकार, राजकीय पदाधिकारी, मित्रमंडळी आदींनी अभिनंदन केले.

Protected Content