जळगावातील अवैध धंद्यांचा बंदोबस्त करा; पोलीस अधिक्षकांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. सहज उपलब्ध होणाऱ्या पैशांमुळे अनेक तरुण अवैध धंद्यांच्या आहारी गेले आहेत. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन अवैध धंदे तात्काळ बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव विभाग अध्यक्ष कमलेश देवरे यांनी केली आहे.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. यात नमूद करण्यात आले की, शहरातील अवैध धंद्यांमुळे अनेक तरुणांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती आहे. अवैध धंद्याच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे शहरात खुनाच्या घटना घडल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने ही बाब दुर्लक्षित न करता अवैध धंद्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

खूनाच्या घटना वाढल्या
शहरात खून, दरोडे, बलात्कार, दंगलींसह अवैध धंदे वाढले असून, यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. तसेच गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम राखून खाकीचा दबदबा निर्माण करण्यासाठी आयपीएस दर्जाच्या डीवायएसपींची गरज आहे. असे असताना गेल्या अडीच महिन्यांपासून उपअधीक्षकपदाची जागा रिक्त आहे. शहरातील जुने बस स्थानक परिसरात खुनाचा थरार असू द्यात नाही तर स्टेटबँके जवळील गोळीबाराची घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नित्याचे चाकूहल्ले, वाढत्या घरफोड्या, गल्लोगली अवैध धंदे आणि गुन्हेगारांचा हैदोस यांवर आळा घालण्याची मागणी होत आहे.

Protected Content