पातोंडी येथे बंद घरातून सामानांची चोरी; दोन जणांवर गुन्हा दाखल

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडी येथे बंद घरातून दोन जणांनी ७ हजार ५०० रुपये किमतीचे मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बाबुराव ठाकणे (वय-५३) रा.पातोंडी ता.रावेर ह.मु.ठाणे यांचे गावात घर आहे. दरम्यान व्यवसायानिमित्त ते ठाणे येथे स्थायिक झालेले आहे. ८ ऑक्टोंबर दुपारी २ वाजेच्या पूर्वी संशयित आरोपी मधुकर गोंडू इंगळे आणि पंडित चुडामण ठाकणे दो. रा. पातोंडी ता. रावेर यांनी संगनमताने ज्ञानेश्वर ठाकणे यांच्या घरातील टीव्ही, फॅन, ४ लोखंडी पत्रे, २ क्विंटल गहू आणि लोखंडी स्टूल असा एकूण ७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ज्ञानेश्वर ठाकणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात मधुकर इंगळे व पंडित ठाकणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत दोघांना अटक झालेली नसून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content