चाळीसगावात दुकान फोडून रोकड लांबविली; पोलीसात गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी ।चाळीसगाव शहरातील अष्टभुजा व्यापारी संकुलातील नवकार ड्रायफ्रुट नावाच्या दुकानातील गल्ल्यातील अज्ञात चोरट्यांनी २ हजार १०० रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, हुकुमचंद चांदमल खाबिया  (वय-६०) रा. हनुमान वाडी, नवकार बंगला, स्टेशन रोड, चाळीसगाव यांचे शहरातील अष्टभुजा व्यापारी संकुलात नवकार ड्रायफ्रूट्स नावाचे दुकान आहे. ७ ऑक्टोबर रात्री ९ ते ८ ऑक्टोबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान बंद दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी गल्यातील २ हजार १०० रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार सकाळी ६ वाजता  उघडकीला आल्याने हुकुमचंद खाबिया यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल सोनवणे करीत आहे.

Protected Content