पहूर येथे बंद घर फोडून ५२ हजाराचा मुद्देमाल लंपास; पोलीसात गुन्हा दाखल

पहूर ता.जामनेर प्रतिनिधी । नांदेड तालुक्यातील गोंदेगाव येथील बंद  घरातून अज्ञात चोरट्याने  ५२ हजार रुपयांची रोकड व काही वस्तू लंपास केल्याचे उघडकीला आले. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, स्वप्नील सुरेश मसकर (वय-२०)  रा.गोंदेगाव ता. जामनेर जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. दरम्यान १८ सप्टेंबर दुपारी १२ ते ६ ऑक्टोंबर सकाळी ९ वाजेच्या ते घराचे कुलूप लावून बकी ता. बोदवड येथे कामानिमित्त गावाला गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ५० हजार रुपयांची रोकड आणि २ हजार रुपये किमतीचे वस्तू असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरोधात पहूर पोलीसात  तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत वीरणारे  करीत आहे

Protected Content