पाचोरा येथे दुचाकीवरून १ लाखाची रोकड लांबविण्याच्या प्रयत्नात एकाला अटक

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील रेल्वेस्थानकाजवळ लावलेली दुचाकीला लावलेल्या पिशवीतून १ लाख रुपये रोकड लांबविण्याचा प्रयत्नात एकाला अटक केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, श्रीराम आनंद चौधरी (वय-६७) रा. परधाडे ता. पाचोरा हे दुचाकीने रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आंबेडकर पुतळ्याजवळ काल शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता आले होते.  त्याठिकाणी संशयित आरोपी नाना देवराज शिंदे (वय-२०) रा. गणपत गड सोलापूर हा दुचाकी जवळ येऊन पिशवतील १ लाख रुपयांची रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न दुचाकी श्रीराम चौधरी यांनी हाणून पाडला. संशयित आरोपी नाना शिंदे यांला पाचोरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ यशवंत घोडसे  करीत आहे

Protected Content