Home धर्म-समाज नागपूरला वारंवार आले तर सुबुद्धी मिळेल

नागपूरला वारंवार आले तर सुबुद्धी मिळेल

0
62


मुंबई/ नागपूर लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे खा. संजय राऊत दौऱ्यावर आहेत. राऊत हे नागपूरच्या दौऱ्यावर वारंवार आले तर त्यांना सुबुद्धी मिळेल, असा टोला फडणवीस यांनी लावला

शिवसेना खा. संजय राऊत यांनी नागपूर उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड असून एकेकाळी शिवसेनेची ताकद चांगली होती. विदर्भात शिवसेना वाढवायची असेल, तर नागपुरात पाय घट्ट रोवणे गरजेचे आहे असे म्हटले होते. नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण असून खा.राऊतांनी नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल अशी टीका ना.फडणवीस यांनी केली.

 

बदल्यांचे आदेशाला स्थगिती निर्णयावर संशय

यावेळी राज्यातील आयपीएस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी दिले. परंतु लगेचच १२ तास होत नाहीत तोच त्यातील १० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशाला स्थगिती देण्यात आली. फडणवीसांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश परत घेण्यामागे प्रशासकीय चूक आहे कि नेमके काय कारण आहे? याचा खुलासा झाला पाहिजे. यापूर्वी देखील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून बदली घोटाळा चौकशीच्या प्रकरणात अडकले असल्याचेही ना. फडणवीस म्हणाले.


Protected Content

Play sound