आपचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत दाखल

vba karykarta pravesh

रावेर प्रतिनिधी । रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नुकताच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वार विश्‍वास ठेवत; तसेच अ‍ॅड.राहुल पाटील व डॉ. सुनील देवरे यांच्या प्रयत्नाने वंचित बहुजन आघाडीत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यात रावेर येथील डॉ.सुनील पवार,आम आदमी पार्टीचे शहर प्रमुख वसीम मंसुरी,अफसर पिंजारी, शे.अयाज,शे.आरीफ यांचा समावेश आहे.

पक्षात प्रवेश करणार्‍या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत संतोष बोदडे, आर.के.गणेश, राजु बोदडे, रवी बोदडे व संजय कांडेलकर तालुकाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ व कौस्तुभ शिंदे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष यांनी स्वागत केले. या सर्वांनी वंचीत बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेत बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय व सामाजिक तत्त्व जनमानसात रुजवून वंचित समूहाला सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी तन मन धननाने झटणार असे आश्‍वासन दिले.

Protected Content