भरधाव रूग्णवाहिकेच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू!

चाळीसगाव, प्रतिनिधी | औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या रूग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या सफेद निळ्या रंगाची रूग्णवाहिकाने जोरदार धडक दिल्याने दिपराज मोतीराम उर्फ नवनाथ चव्हाण (वय-१०) रा. मिटमिटा ता.जि. औरंगाबाद या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव ते कन्नड या राष्ट्रीय महामार्गावर घडली. हि २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास बोढरे शिवारातील पैलवान ढाब्याजवळ घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी घटना घडताच रूग्णवाहिका हि कन्नड घाटाकडे पसार झाली. दरम्यान गणेश भावराव खरात ह.मु. बोढरे शिवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम-३०४ (अ), २७९ व मोटार वाहन अधिनियम कलम १८४ व १३४ ( ब) प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन सोनवणे हे करीत आहेत.

Protected Content