चाळीसगाव येथे हवा प्रदुषण मापक यंत्राचे उद्घाटन

चाळीसगाव प्रतिनिधी । नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ही योजना राबविण्यात येत असून हवेतील प्रदूषणाची तपासणी मोजण्यासाठी आर.डी.एस. या यंत्राची उद्घाटन नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांच्याहस्ते सुवर्णा स्मृती उद्यान येथे करण्यात आले. 

नगरपालिका यांनी माझी वसुंधरा अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियाना अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास आर.डी.एस (रिस्पायरेबल डस सॅम्पलर) या हवेतील प्रदूषण तपासणी यंत्राचा उद्घाटन नगरपालिकेच्या अध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याहस्ते सुवर्णा स्मृती उद्यान येथे करण्यात आले. 

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे व कर्मचारी उपस्थित होते. हा यंत्र नाशिक येथील अश्वमेद इन्वायर इंजीनियर्स कंपनी येथून आयात केले असून याचा उपयोग हवेतील प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्युत वाहनांना चॅरजिंग करण्यासाठी सुवर्णा स्मृती उद्यान येथे चॅरजिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. या यंत्राचा उपयोग २४ घंट्यानंतर होतो. हवेतील प्रदूषणाची तपासणी अहवाल हा पंधरा दिवसांनी प्राप्त होतो. प्रदुषणाला आटोक्यात आणण्यासाठी यावेळी शपथ घेतली गेली. भविष्यात विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यावर अधिक भर असणार असल्याचे प्रतिपादन गोरे यांनी सुतोवाच केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content