Home क्राईम समता नगरातील विवाहितेचा दोन लाखासाठी छळ

समता नगरातील विवाहितेचा दोन लाखासाठी छळ

0
73
mahila

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील समता नगर येथील माहेर असलेल्या तसेच गेंदालाल मिल मधील सासर असलेल्या विवाहीतेचा दोन लाख रुपयांच्या हुंड्याच्या पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

समता नगरातील वर्षा प्रीतम बागडे वय 26 यांचा गेंदालाल मिल मधील तरुणाशी विवाह झाला होता. 2016 ते 2021 या दरम्यानच्या काळात  पतीसह सासरच्या मंडळींनी माहेरून हुंड्याचे दोन लाख रुपये आणावेत. या कारणावरून वर्षा यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने वर्षा बागडे या माहेरी निघून आल्या.  याप्रकरणी वर्षा बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती प्रीतम हरिभाऊ बागडे , सासरे हरिभाऊ विश्रामजी बागडे, सासू पुष्‍पाबाई हरिभाऊ बागडे, व  मनोज हरिभाऊ बागडे चौघे रा. गेंदालाल मील यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

 


Protected Content

Play sound