जळगावात धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील 25 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, सुमित कैलास खेडकर (वय 25, रा. पिंप्राळा हुडको, नवीन दुध फेडरेशन जवळ) हा बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. सोबत बॉम्बे सायकल मार्टवर गेल्या दोन महिन्यांपासून कामाला होता. त्यामुळे कुटुंबियांना हातभार लागत होता. दरम्यान काल सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रेल्वे थांबा क्रमांक 418/ 15-17 डाऊन वर धावत्यारेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समोर आले. सुरुवातीला अनोळखी म्हणून लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयत तरूणाच्या खिशात आधारकार्ड पॅनकार्ड यांच्या आधारावरून ओळख पटली.

वडील हे हात मजुरी चे काम करत असतात. एकुलता-एक मुलगा असल्यामुळे मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामराव इंगळे आणि किशोर पाटील करीत आहे.

Protected Content